केडिसिसी चे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या हस्ते इन्शुरन्स लाभार्थ्याना धनादेश वाटप
बांबवड़े : कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून एक्साईड लाईफ व ईफको टोकिओ इन्शुरन्स कंपनी मार्फ़त अपघाती विमा योजने अंतर्गत मयत वारसांना जिल्हा बँकेचे संचालक श्री रणवीरसिंग गायकवाड सरकारयांच्या हस्ते लाभार्थीना धनादेश चे वाटप करण्यात आले.

लाभार्थी मध्ये श्रीमती विजयमाला एकनाथ जगताप रहाणार चरण, श्रीमती अंजना नामदेव पाटील रहाणार सावे, श्रीमती चंद्रकला गणपती पाटीलरहाणार अनुस्कुरा सर्व तालुका शाहुवाडी, येथील रहिवाशी आहेत.

यावेळी बँकेचे विभागीय अधिकारी ए.के.सातपुते, एक्साईड लाईफ इन्शुरन्स कंपनी चे विनोद लव्हटे, निरीक्षक एन.डी. जामदार, शशी पाटील, बबन लुगड़े, महादेव पाटील, संग्राम कदम, गोडाउन कीपर विकास माळी आदि मंडळी उपस्थित होती.