तरुणांच्या हातात दगड देण्यापेक्षा बेरोजगारांना काम दया-खासदार माने

मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ):
     ऐनवाडी धनगरवाडी हे रेशीम उद्योगाचं गाव म्हणून नवीन ओळख उभी करीत आहे .आणि त्याबरोबरच  स्थानिकांना रोजगार देणारं महत्त्वाचं केंद्र बनेल, यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यास मी सदैव कटिबद्ध रहाणार आहे. असा आत्मविश्वास खासदार धैर्यशील माने यांनी धनगरवाडी येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला. तशी त्यांनी ग्वाही देखिल यावेळी दिली.. कोल्हापूर वन विभाग,, वनपरिक्षेत्र मलकापूर संयुक्त वन व्यवस्थापन समिती ऐनवाडी धनगरवाडी यांच्यावतीने आयोजित ‘ शाहुवाडी तालुक्यातील ऐनवाडी धनगरवाडी गावाला जंगल रेशीमचे गाव म्हणून बहुमान देण्याचा लोकार्पण सोहळा शुभारंभ संपन्न झाला.  याप्रसंगी खासदार धैर्यशील माने बोलत होते.


यावेळी मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन , वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री एन एस लडकत ‘सहाय्यक वनसंरक्षक  गणेश पाटोळे ‘ जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, उप वनसंरक्षक श्री. जी. गुरुप्रसाद, डॉ. योगेश फोंड़े, विजयसिंह देसाई आदि मान्यवर यावेळी उपस्थित होती.


पुढे बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले कि, कोल्हापूर जिल्हा हा रेशीमचा जिल्हा म्हणून पुढे येणार आहे. यासाठी रेशीम उद्योगासाठी आवश्यक असणारी अंडी बँक देखील या ठिकाणी उभी करू. जेणेकरून त्याचा सर्वांना लाभ होईल. आपल्या भागातील वातावरण रेशीम साठी पोषक आहे. परमेश्वराने आपल्याला संधी दिली आहे. त्याचा आपण योग्य वापर करणे गरजेचे आहे. आपली उत्पादने जागतिक स्तरावर कशी जातील, यासाठी आपण विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणारच आहे. महिलांच्या साठी देखील ही एक रोजगाराची स्वावलंबन बनण्याची सुवर्णसंधी आहे. विकासाचा नवा राजमार्ग या परिसरातून जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली .


    X हातात दगड घेऊन आंदोलनापेक्षा हाताला काम महत्त्वाचं X


    हातात दगड घेऊन आंदोलन करत, डोकी भडकवण्यापेक्षा, रोजगार निर्मिती करून हाताला काम देणे, हे खरं विकासाचं गमक आहे. आणि म्हणूनच आज शाहूवाडी सारख्या ग्रामीण भागात ऐनवाडी धनगरवाडी या ठिकाणी उभा राहत असलेला, हा रेशीम उद्योग प्रकल्प तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आहे .यासाठी या प्रकल्पात सर्वांनी सहभागी होऊन आपला उत्कर्ष साधण्याची संधी साधावी, असे आवाहन ही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.


मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजम यांनी देखील या प्रकल्पाविषयी आवश्यक असणाऱ्या बाबी आणि कशा पद्धतीने हा प्रकल्प उभा राहिला याविषयी मार्गदर्शन केले .


   या वेळी एन एस लडकत, मोरेश्वर सोनकुसरे, दगडू व्हावळे यांनी मनोगत व्यक्त केले .


     प्रारंभी टसर वन्य रेशीम प्रकल्प संकल्पना व संशोधन चे डॉ योगेश फोंडे .यांनी टसर रेशीम बाबत राबवलेली संकल्पना व यापुढे करावयाची उपायोजना व राबवले जात असलेले प्रकल्प याची सविस्तर माहिती दिली .


     यावेळी नंदकुमार नलावडे, नवनाथ कांबळे, अमित भोसले, रवींद्र सूर्यवंशी, जालिंदर भोसले आदींच्या सह परिसरातील शेतकरी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . डॉ योगेश फोंडे यांनी आभार मानले .

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!