नजरचूक सरकारी बाबूंची आणि फटका मात्र कासार्डे ला : दुरुस्तीसाठी आमदार कोरेंचे प्रयत्न
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ):
मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहूवाडी तालुक्यातील कासार्डे येथील ७/१२ उताऱ्यावर पुर्वी नजरचुकीने झालेले देव धोपेश्वर देवस्थान असे नाव कमी करणेबाबत आमदार डॉ. विनय कोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
कासार्डे येथील शेतकऱ्यांच्या शेतीच्या ७/१२ उताऱ्यांवर पूर्वी नजरचुकीने देव धोपेश्वर देवस्थान असे नाव लागल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना बँक व इतर तत्सम कामांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. याची दखल घेत राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना बैठक घेण्याची विनंती केली. झालेल्या बैठकीत संबधित अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी महसूल विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील (पेरीडकर) यांच्यासह राज्याच्या महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.