थेरगाव इथं नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा आखाडा, तर पुरस्कार वितरण सोहळा सुद्धा – पैलवान पोपट दळवी सरकार
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ): थेरगाव तालुका शाहुवाडी इथं विविध राज्यातील दिग्गज मल्लांच्या उपस्थितीत भव्य कुस्त्यांचे मैदान, व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. संयोजक पैलवान पोपट दळवी सरकार यांनी बांबवडे इथं संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.

हा सोहळा देशभक्त रत्नाप्पा आण्णा कुंभार यांच्या ११३ व्या जयंती निमित्त बुधवार दि. २२ मार्च २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता गुढी पाडवा या दिवशी संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास पैलवान भोला पंजाब महान भारत केसरी. पैलवान राकेश जम्मू जम्मू काश्मीर, अमित दिल्ली, प्रवीण कुमार हरयाणा, सचदेव सिंग पंजाब, अजित पाटील महाराष्ट्र, विविध राज्यातील दिग्गज मल्लांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक मल्लांच्या कुस्त्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. तसेच देशभक्त रत्नाप्पा आण्णा कुंभार समाज सेवा संस्थेतर्फे कुस्ती भूषण, सर्वोत्कृष्ट खेळाडू, उद्योग रत्न, कृषी भूषण,अशा पुरस्कारांचे या क्षेत्रात काम करणाऱ्या आठ लोकांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तरी कुस्ती शौकीनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देशभक्त रत्नाप्पा आण्णा कुंभार समाज सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक पैलवान पोपट दळवी थेरगावकर यांनी केले आहे.

यावेळी या पत्रकार परिषदेस ह.भ.प. अंकुश महाराज शिरगावकर, संदीप काळे, रोहित फाटक, योगेश खोत, आदी मान्यवर उपस्थित होते.