समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी आरोग्य केंद्रास १६ लाखांचे सर्जिकल साहित्य भारत पेट्रोलियम व रोटरी च्यावतीने मोफत
मलकापूर प्रतिनिधी : समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी आंबर्डे गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास सोळा लाख रुपयांचे सर्जिकल साहित्य रोटरी च्या माध्यमातून मोफत देण्यात आले. यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. व रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्टा चे अनमोल सहकार्य लाभले. असे मत सेवानिवृत्त कर्मचारी गौतम लोखंडे आंबर्डेकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले कि, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असू दे, आणि कितीही यशस्वी होवू दे, परंतु आपल्या गावाला आपण विसरू शकत नाही . म्हणूनच या प्राथमिक आरोग्य केंद्राला रोटरीच्या माध्यमातून प्रचंड अशी मदत झाली या पंचक्रोशीत हे एक मॉडेल ठरेल. १६ लाखाचे सर्जिकल आरोग्य साहित्य या पंचक्रोशीतील रुग्णांसाठी वरदान ठरेल, आणि शाहूवाडीसाठी एक आदर्श ठरेल. रोटरी प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्व घटकांसाठी नेहमी आरोग्य आणि शिक्षण यासाठी आदर्शवत काम करते. याचा सार्थ अभिमान आम्हा शाहूवाडीकरांना आहे. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी ग्रामीण भागातील मुलांनी मर्दानी खेळाचे दाखवलेले प्रात्यक्षिक पाहून मुंबईचे पाहुणे भारावून गेले. स्वागत व प्रास्ताविक रोटरीचे राजेश कोष्टी यांनी केले.

यावेळी रोटरीचे डॉ.बाळ इनामदार, आनंद कुलकर्णी (पीडीजी), व्यंकटेश देशपांडे (डीजी) यांनी मनोगत केली.

यावेळी सौ. संगीता चौहाण (प्रेसिडेंट), मिथुन गाडा, संजय साळुंखे, डॉ. सज्योती जाधव, बाळासाहेब लोखंडे, बाळासाहेब पाटील, महेश पाटील, महेंद्र पाटील, विकास रणवरे, संजय साळुंखे आदी मान्यवर व आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार सौ मनीषा लोखंडे यांनी मानले.