जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शाहुवाडी तहसील कार्यालयावर थाळी नाद मोर्चा
मलकापूर प्रतिनिधी : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शाहुवाडी तालुक्यातील विविध कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी शाहुवाडी तहसीलदार कार्यालयावर थाळी नाद मोर्चा काढण्यात आला.

संपात उतरलेल्या विविध पेशान कर्मचाऱ्यांनी शाहुवाडी पंचायत समिती पासून शाहुवाडी तहसीलदार कार्यालयावर हातात थाळी आणि पळी घेवून विविध घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

पेन्शन मागणीसाठी घंटानाद करत बहुसंख्येने आलेल्या पेन्शन कर्मचाऱ्यांच्या या घंटानादाने संपूर्ण शाहुवाडी तहसीलदार कार्यालय परिसर दणाणून गेला.

यावेळी निवासी नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी विविध शिक्षक संघटनेचे नेते उपस्थित होते. शिवाजी रोडे पाटील, साहेब शेख, बाबा साळुंखे, उमेश कुंभार, संजय जगताप, नाना कांबळे, सदाशिव कांबळे, तसेच वनरक्षक वनपाल संघटनेचे जालिंदर कांबळे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन चे प्रमोद गायकवाड, प्रवीण पोवार, असे विविध ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी तलाठी, सरकारी, निमसरकारी, कर्मचारी या थाळी निदर्शनावेळी उपस्थित होते.