शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी चा धडक मोर्चा – माजी खासदार राजू शेट्टी

मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) :
ऊन- वारा -पाऊस यामध्ये शेतकरी सातत्याने राबत असतो, जंगली वन्यप्राण्यापासून त्याचे संरक्षण व्हावे, जनतेला लाईट व्यवस्थित मिळावी, रेशन धारकांना वितरण व्यवस्था व्यवस्थित व्हावी, जंगली प्राण्यांचा बंदोबस्त व्हावा, वाढीव विज बिल रद्द करावी, अशा विविध मागण्यांसाठी शाहुवाडी तहसील कार्यालयावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा धडकला.


या मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि शेकापचे भाई भारत पाटील यांनी केले. विविध मागणीचे निवेदन घेऊन या शासनाला जाब विचारासाठी आलोय, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शाहूवाडी तहसील कार्यालयावर करण्यात आलेला धडक मोर्चा प्रसंगी केले.


माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले, जंगली प्राण्याचे हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या शेतकऱ्यांना २० लाख रुपये तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. जंगलातील गवे व हत्ती पासून शेतीचे संरक्षण व्हावे तसेच शेती पिकाचे नुकसान भरपाई देत असताना वन विभागाकडून प्रति गुंठा 3000 रुपये नुकसान भरपार द्यावी. सदर नुकसान भरपाईचे पंचनामे, नुकसान झाल्याच्या एक आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करावी. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या गायी व त्यांच्या चालू बाजारभावातील किमतीप्रमाणे प्रति १ लाख रुपये, मेंढीकरिता 25 हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी. शेतीची कामे करत असताना शेतकरी साप चावून मृत्यू पावल्यास त्याला जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात देण्यात येणारी नुकसान भरपाई देण्यात यावी. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात यावे. डोंगरी भागात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असून, शेतीला दिवसा विज पुरवठा करण्यात यावा.


दरम्यान गव्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या किंवा वन्यप्राणी यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावे.


गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व अधू झालेल्या शेतकऱ्याचं काय ?


यावेळी वाकोली येथील गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेले तानाजी धोंडीबा आरसेकर हे यावेळी हजर होते. त्यांनी आपला स्वतःचा शर्ट काढून गव्याच्या हल्ल्यात मोडलेली आपल्या छातीची बरकडी दाखवली, आधी माणसाची सुरक्षा, मग जनावराची सुरक्षा. मी स्वतः याबाबत वन मंत्र्यांशी बोलून घेणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार असून महापुरात जळालेल्या डीपी अजून बदलल्या नाहीत आणि यांची विज बिले वाढून येतात. ग्राहकांना व्यवस्थित सेवा मिळत नाही, शेतीने पाणी पाजायसाठी वन्य प्राण्यांच्या भीतीने रात्री ऐवजी दिवसा लाईट देण्यात यावी. महावितरण, वनविभाग आणि महसूल या विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम जर नाही केलं, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि तुमच्यातला संघर्ष अटळ आहे हे ध्यानात ठेवा असा गंभीर इशाराही त्यांनी यावेळी दिला.


यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, राज्य सचिव राजेंद्र गड्डेनवार, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, शेकाप भाई भारत पाटील, राधानगरी पंचायत समिती उपसभापती अजित पवार, जनार्दन पाटील ,सांगली जिल्हा युवा अध्यक्ष संदीप राजोबा, शाहुवाडी तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, राजू वडाम,पद्मसिंह पाटील, राजू देशमाने आदी बहुसंख्येने शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!