केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळात पोहोचवा- वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
पन्हाळा प्रतिनिधी : सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा असे प्रतिपादन केंद्रीय हवाई नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.

पन्हाळा येथे आयोजित लोकसभा प्रवास संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गेली दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज पन्हाळा येथे आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, गेली नऊ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची यशस्वी वाटचाल सुरू असून, त्यांनी समाजातील तळागाळातील घटकांसाठी राबविलेल्या योजना कौतुकास्पद आहेत. तीस कोटी जनता बँकेशी जोडली गेल्यामुळे केंद्र सरकारच्या सर्वच योजना मधील लाभ, लाभार्थ्यांच्या थेट खात्यात पोहोचत आहेत.आयुष्यमान भारत योजना, जनधन योजना, उज्वला योजना यासारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांचे जगणे सुखकर झाले आहे. गेल्या काही वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत नवी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असून, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या वर्षभरात प्रयत्न करावेत.

आज सकाळी ज्योतिर्लिंग देवस्थान दर्शनानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यांचे गिरोली, वाघबीळ तसेच बांबरवाडी येथे जोरदार स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, राजाराम शिपुगडे, तालुका अध्यक्ष सचिन शिपुगडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिग्विजय पाटिल, सरचिटणीस अविनाश चरणकर, मंदार परितकर पन्हाळा शहर अध्यक्ष, अमरसिंह भोसले कोडोली शहर अध्यक्ष, महेश जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य, के एस चौगुले (आण्णा), शिवाजीराव पाटील, मं ,माधवी भोसले पन्हाळ्याच्या माजी नगराध्यक्ष रूपाली धडेल,अजय चौगुले, मिलिंद कुऱ्हाडे, अमर लुपणे, रघुनाथ झेंडे, केदार उरूनकर , संजय सावंत, उदय पाटील, राकेश मोरबळे, प्रकाश देशमुख, सागर खवरे, लालासो पोवार, प्रकाश पाटील, अमोल काटकर, रुपेश पाटील, सुधीर बोळावें, आनंदा अंगठेकर, भिकाजी गुरव, लक्ष्मण तळेकर, बळवंत टिक्के, अवधूत दळवी, दत्ता बोबडे, पृथ्वीराज भोसले, मनोज नाख़रे, राजीव सोरटे, राष्ट्रीय बहुजन महासंघ अध्यक्ष नंदकुमार कांबळे, चंद्रकांत गवंडी, महेश वरवंटे उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चाचे पन्हाळा तालुका अध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी स्वागत केले. प्रस्तावित अमर भोसले आभार अविनाश चरणकर यांनी मानले.