प्रा. डॉ. एन.डी पाटील महाविद्यालय मलकापूर – पेरीड मध्ये सांस्कृतिक वेशभूषा व पाककला स्पर्धा संपन्न
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : आपल्या संस्कृतीचे व सांस्कृतिक वेशभूषेचे ज्ञान आपल्या नव्या पिढीला होणे, गरजेचे आहे.आपली संस्कृती व परंपरा या सर्वांचा अभ्यास आजच्या पिढीसाठी उपयुक्त आहे. असे मत प्रतिपादन प्रा. डॉ. एन.डी पाटील महाविद्यालय मलकापूर – पेरीड चे प्राचार्य डॉ.टी. एन. घोलप यांनी केले.


शाहुवाडी तालुक्यातील प्रा. डॉ.एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर – पेरीड मध्ये सांस्कृतिक विभागामध्ये सन२०२३ साठी पारंपारिक वेशभूषा दिन व पाककला स्पर्धा आयोजित केली होती.

यावेळी कार्यक्रमाचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख भास्कर चिखलीकर यांनी केले. यावेळी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून पारंपारिक वेशभूषेचे एकूण १० गटसहभागी झाले. यामध्ये कोळी पेहराव, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे, केरळी पेहराव, आदिवासी पेहराव, वारकरी पेहराव, दक्षिण भरतीय, धनगरी पेहराव, जेलर व कैदी पेहराव अशा वेशभूषांचा समावेश होता.

यावेळी पाककला स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे एकूण ३० स्टॉल मांडण्यात आले. यामध्ये समोसा, इडली, आप्पे, बिर्याणी, नाचणीची भाकरी, चिकन ६५ असे खाद्यपदार्थ स्टॉल मध्ये उपलब्ध होते. यामध्ये एकूण ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेसाठी प्राचार्य, सर्व कमिटी सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचे सहकार्य लाभले.