मलकापूर मध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
मलकापूर प्रतिनिधी
हिंदू संस्कृतीचे रक्षण या शुद्ध हेतूने चैत्रशुद्ध प्रतिपदा शालीवाहन शके १९४५ प्रारंभ, कलीयुगाबद्ध ५१२५ प्रारंभ, अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मलकापूर मध्ये हिंदू नववर्षाचे जंगी स्वागत करण्यात आले.

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर या ठिकाणी गुढीपाडवा व हिंदू नववर्ष या दिनाचे औचित्य साधून ५ दिवस मोठे कार्यक्रम आयोजित केले.

यामध्ये पहिल्या दिवशी- ऐतिहासिक चित्रपट, दुसरा दिवस- देव, देश आणि धर्म पर गीते, तिसरा दिवस- ह. भ. प. शिरीष मोरे( संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज) यांचे व्याख्यान, चौथा दिवस- प्रभू श्रीरामांची फुलाची रांगोळी, पाचवा दिवस- पारंपारिक वेशभूषा मध्ये व वाद्यांच्या गजरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा हे कार्यक्रम घेण्यात आले.

मलकापूर मधील सुभाष चौक येथे सर्व कार्यक्रम झाले. यावेळी सर्व कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष -अनंत भोसले, कार्याध्यक्ष- सुशांत मोहिते, सचिव- रुपेश वारंगे व सर्व मलकापूर वासीयांनी केले.