लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली मध्ये नवीन प्रवेशाची सुरुवात
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली तालुका शिराळा इथं गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्याध्यापक डी.पी.गवळी सर व पालक प्रतिनिधी महेश्वरी सटाले यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून, पाटी पूजन करून नवीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली या शाळेत विद्यार्थ्यांवर वयैक्तिक लक्ष पुरविले जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, हे शाळेचे ब्रीद असून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी इथं विशेष प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना सकस माध्यान्ह जेवण दिले जाते.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणारी हि शाळा असून, इथं विद्यार्थ्यांना १०० % पुस्तकांचे वाटप केले जाते.

यावेळी अभिजित चिले, शैलेश कांबळे, संदीप घागरे, स्वप्नाली कांबळे, यांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला. तसेच विद्यार्थ्यांना नवीन वर्षानिमित्त पाटी, वही भेट म्हणून देण्यात आली. सर्वांना पेढे वाटून नवीन वर्ष साजरे करण्यात आले.

यावेळी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.