शाहुवाडी पोलिसांची पुन्हा एकदा मोठी कारवाई
मलकापूर प्रतिनिधी
विशाळगड या ठिकाणी शाहूवाडी पोलीस गस्तीपथकाने, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर प्रतिबंधित क्षेत्रात गांजाचे सेवन करत असताना इसमास अटक केली.

20 जानेवारी 2023 रोजी उपनिरीक्षक सचिन पांढरे, पोलीस अंमलदार चिंतामण बांबळे, श्रीकांत दाभोळकर, चौगुले,येसादे या गस्तीपथकाने, विशाळगड येथे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर प्रतिबंधित क्षेत्रात गांजाचे सेवन करताना अमीर अन्सार अहमद बिस्ती, वय वर्ष 23 राहणार धारवाड कर्नाटक यास अटक करण्यात आली. या आरोपीस 24/3/2023 रोजी मा. न्यायालयाने त्या इसमास 12 हजार रुपये दंड/ 2 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे यांनी केला.