शाहूवाडी माण गावच्या जवळ गॅस टँकरचा अपघात : एक ठार
मलकापूर प्रतिनिधी
शाहुवाडी तालुक्यातील मान गावानजी गॅस टँकरचा सकाळच्या सुमारास अपघात होऊन ड्रायव्हरच्या जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक एन. एल. 01 एन. 6970 हा कोल्हापूरच्या दिशेने निघाला असता 25 मार्च रोजी सकाळच्या दरम्यान ट्रक चालकाचा गाडीचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडील, ब्रॅकेट तोडून पलटी झाली. यावेळी चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मृतदेहाची ओळख पटलेली नसून, पोलीस तपास करत आहेत.

घडलेल्या घटनास्थळी मलकापूर नगर परिषदेची अग्निशमन गाडी व कर्मचारी विठ्ठल वारकरी,अमर पाटील, गणेश पांढरबळे, शाहिद मिस्त्री तसेच शाहुवाडी पोलीस ए.पी.आय. शैलजा पाटील, पी.एस.आय. पांढरे, कोळपे, सावंत, सुरेश पाटील, दिपाली यादव, दिगंबर चिले, प्रसाद कांबळे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

या गॅस टँकर मुळे सध्या मलकापूर – अनुस्कुरा मार्गावर झालेल्या अपघाताच्या ठिकाणी वाहतूक, सुरक्षेच्या दृष्टीने थांबवण्यात आली आहे.