शिंपे सेवा संस्थेच्या विजयासाठी विकासाचे वारे वाहू द्या- संपत पाटील
बांबवडे : वाहणार असतील तर विकासाचे वारे वाहू द्या, बदलाचे नव्हे. कारण बदलाच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होवू नये, यासाठी शिंपे तालुका शाहुवाडी येथील ज्योतिर्लिंग वि.का.स. सेवा संस्थेच्या निवडणुकीत अजित गुंगा पाटील, यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत. त्यामुळे विजयाचा गुलाल हा आम्ही उधळणारच,, असे मत येथील तरुण तडफदार युवा कार्यकर्ते संपत पाटील यांनी व्यक्त केले.

येत्या २ एप्रिल रोजी येथील सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न होत आहे. या अनुषंगाने संपत पाटील बोलत होते.

यावेळी संपत पाटील पुढे म्हणाले कि, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल हवा,असे सांगत आपली राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात काही मंडळी आहेत. परंतु अजित पटतील आप्पा यांनी येथील शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात सेवा संस्थेच्या माध्यमातून केडीसिसी बँकेच्या माध्यमातून त्यांना मदत केली आहे. आणि हि मदत भविष्यात सुद्धा सुरु राहील. यासाठी त्यांना या निवडणुकीत विजयाचा गुलाल लावला पाहिजे, हा निश्चय सर्व सामान्य शेतकरी वर्गाने केला आहे.

असे सुद्धा संपत पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.