आकाशातील गगनभरारी साठी हृदयात आत्मविश्वास रहावा – आमदार डॉ. विनय कोरे
बांबवडे : वारणानगर तालुका पन्हाळा येथील श्री वारणा विद्यालयामध्ये सन २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षात दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद व कृतज्ञता समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज हि मुले विद्यालयाचा निरोप घेत असताना, आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर उभी आहेत. या ठिकाणाहून त्यांना आता आणखी पुढे जायचे आहे. यशस्वीतेची उंच गगनभरारी त्यांना घ्यायची आहे. यासाठी त्यांच्या पंखात बळ यावे, आणि हृदयात आत्मविश्वास रहावा, यासाठी त्यांना आशीर्वाद आणि मार्गदर्शन डॉ. विनय कोरे यांनी केले.

तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.बी. मलमे, पर्यवेक्षक जे.एस.बिचकर, के. एस. घुगे. आर.एन.सातपुते, पालक प्रतिनिधी संदीप गिरी गोसावी, या मान्यवरांसाहित सर्व शिक्षक, पालक, व विद्यार्थी उपस्थित होते.