बाप …..बों …हात गेला …
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातून रत्नागिरी – नागपूर महामार्ग जात आहे. यामुळे काही शेतकऱ्यांचे उकाळ पांढरे झाले आहे. कारण शासनाने संपादित जमिनीचा दर बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने अधिक दिला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

हा आनंद निश्चित आहे. परंतु तो किती क्षणिक आहे, हे मात्र अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेली जमीन आज जरी चढ्या दराने शासनाने खरेदी केली असली, तरी मिळालेल्या रकमेचा विनियोग कसा करावा, याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे.

तालुक्याच्या पूर्व भागात या गुढी पाडव्याला एवढी वाहने खरेदी केली गेली, कि एवढी वाहने इथून मागे कोणत्याही पाडव्याला कधीच खरेदी केली नसतील. आपण जि वाहने खरेदी करतो, त्याचा आपल्याला किती उपयोग आहे. याचे भान आपण ठेवले पाहिजे.

निश्चित नेहमी रिकामा असलेला खिसा आणि पाकिटे कधी नव्हे, ती भरली गेली, याचा आनंद तर आहेच, पण वाहने खरेदी करून त्याला इंधन घालण्याचं नवीन टेन्शन आपण आपल्या मागे तर लावून घेतलेलं नाही ना ? या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे जर सकारात्मक असेल, तर काही हरकत नाही.

परंतु सध्या काही ठिकाणी पहात असता, बार मात्र फुल भरलेले दिसत आहेत. आपल्या वाड -वडिलांची पुंजी जपून वापरा. केवळ लोकांना दाखवण्यासाठी नव्हे, तर त्याचा उपयोग उद्योग धंद्यासाठी करा. केवळ वाहने घेवून त्यात तेल टाकत बसलात, तर एक दिवस जवळची पुंजी संपून जाईल. आणि मग आपली म्हण आपल्याला माहित आहे. बाप …..बोंबलताना …हात गेला .

हे सर्व कोणत्याही स्वार्थापोटी नाही, तर आपल्या पूर्वजांची पुंजी योग्य रीतीने कार्यवाही करून वापरावी, या चांगुलपणाच्या भावनेतून हा शब्द प्रपंच आहे. यातून कोणाला वाईट वाटले, तर क्षमस्व..