रानगव्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी : केदारलिंग वाडी येथील घटना
बांबवडे ( विशेष प्रतिनिधी ) दशरथ खुटाळे यांजकडून : शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी येथील केदारलिंग वाडीतील शेतकरी बंडू बाबू फिरंगे वय ६१ वर्षे हे आपली पाळीव जनावरे पाणवठ्यावर पाणी पाजण्यासाठी घेवून गेले असता, रान गव्याने त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात ते जखमी झाले असून, त्यांच्या डाव्या बाजूच्या बरगडी ला दुखापत झाल्याने ते त्यांच्या नातेवाईकांना बेशुद्धावस्थेत आढळले.

त्यांच्यावर शित्तूर -तर्फ- वारुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू झाला होता. हि घटना ताजी असताना, आज घडलेल्या या हल्ल्याच्या घटनेमुळे पुन्हा जंगली श्वापादापासून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या श्वापादापासून बंदोबस्त व्हायला हवा, हि मागणी नागरिकांच्यातून होत आहे. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक श्री वाडे यांनी दवाखान्यात येवून रुग्णाची भेट घेतली.

यावेळी दत्तात्रय मगदूम, सुधीर पाटील, समीर कदम, संतोष फिरंगे उपस्थित होते.