शाहुवाडी भाजप तर्फे केंद्रीय मंत्र्यांना शाळी पुलाच्या दुरुस्ती संदर्भात निवेदन
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) :
मलकापूर या ठिकाणी असणाऱ्या शाळी नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाला 130 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा, याची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रवीण प्रभावळकर शाहुवाडी- पन्हाळा विधानसभा प्रमुख यांनी या पुलाच्या दुरुस्ती संदर्भात निवेदन दिले.

निवेदनामध्ये, हा पूल कालबाह्य व धोकादायक झाला आहे, तसेच पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, नवीन पूल होण्यासाठी तातडीने सर्वे करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शाहूवाडी तालुका भाजप संघटनेची अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.