बांबवडे त एक नवी अंगणवाडी इमारत उभी रहात आहे…
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं चिमुकल्यांचा किलबिलाट सुस्थितीत एका छताखाली व्हावा, यासाठी प्राथमिक विद्यामंदिर बांबवडे च्या मागच्या बाजूला एक अंगणवाडी इमारत उभी रहात आहे. सुमारे साडे अकरा लाख रुपये खर्चाची हि इमारत दिपक शामराव पाटील, यांच्या विशेष प्रयत्नातून उभी रहात आहे.

या इमारतीचे पायापूजन नूतन लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले आणि उपसरपंच स्वप्नील घोडे – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अंगणवाडी इमारत म्हणजे देशाच्या भवितव्याच्या घडणजडण चे पहिले पाउल. इथूनच सुरु होते देशाच्या भवितव्याची नवी दिशा. यासाठी त्या चिमुकल्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, हा मुख्य हेतू या नूतन सरपंच व सदस्य मंडळ यांनी ठेवला आहे. इथंच खऱ्या अर्थाने देशाचे भवितव्य घडविले जाते. म्हणूनच या देशाच्या भवितव्याला सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा विचार सरपंच भगतसिंग व सदस्य मंडळाने केला आहे.

यावेळी सुरेश नारकर, संजय पाटील, दिपक निकम, महेश निकम, शरद निकम, विजय कांबळे, मुकुंद प्रभावळे, रणजीत बंडगर, शिक्षक विठ्ठल गुरव, जयसिंग पाटील व विद्यर्थी आणि चिमुकला वर्ग सुद्धा यावेळी उपस्थित होता.