मलकापूर इथं मटका जुगार संदर्भात एकास अटक
बांबवडे : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील बुरुड गल्ली सोमवार पेठ इथं राजू कासीम पठाण वय ५५ वर्षे याला मालक संजय खंडूराव खानविलकर यांच्याकरिता कल्याण मटका चालविताना शाहुवाडी पोलिसांनी बेकायदा जुगार कलम अंतर्गत अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली हकीकत अशी कि, राजू कासीम पठाण यास मलकापूर येथील सोमवार पेठ बुरुड गल्ली येथील इस्त्री च्या दुकानासमोर दि. १ एप्रिल रोजी मटका घेताना पकडण्यात आले. यावेळी त्याच्याकडून ७००१//- रोख रक्कम आढळून आले. त्याच प्रमाणे मटका चे पांढऱ्या रंगाचे बुक आढळून आले.

सदर घटनेचा तपास पोलीस हेड अंमलदार काशीद करीत आहेत.