शिंपे च्या ज्योतिर्लिंग सेवा संस्थेचा १२ जागा जिंकून विजय : शिंपे गावात जल्लोष – संपत पाटील यांची माहिती
बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील ज्योतिर्लिंग वि.का.स.सेवा संस्था शिंपे ची पंचवार्षिक निवडणूक आज संपन्न झाली. या निवडणुकीत ज्योतिर्लिंग विकास पॅनेल चा विजय झाला असून, गावासाठी समर्पणाची भावना ठेवणाऱ्यांचा विजय झाला आहे. असे मत येथील सामाजिक युवा कार्यकर्ते संपत पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.
सर्व विजयी उमेदवारांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने अभिनंदन

शिंपे येथील ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्थेची निवडणूक आज संपन्न झाली. या निवडणुकीत ज्योतिर्लिंग विकास पॅनेल व भैरवनाथ परिवर्तन पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये एकूण १३ जागा लढविणे गरजेचे होते. यापैकी ज्योतिर्लिंग विकास पॅनेल ला १२ जागा मिळाल्या. आणि त्यांचा विजय झाला आहे.

या निवडणुकीत अजित गुंगा पाटील आप्पा हे ज्योतिर्लिंग विकास पॅनेल चे नेतृत्व करीत होते. तसेच त्यांना खंबीर साथ गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते संपत पाटील यांनी दिली. त्यांच्या या समर्थ साथीमुळे विजयाचा मार्ग सुकर झाला. असे म्हणावयास हरकत नाही.

या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजयाचा जल्लोष केला.