मानोली पैकी धाऊडवाडा येथील महिलेची आत्महत्या
मलकापूर प्रतिनिधी : आंबा जवळ असलेल्या मानोली पैकी धाऊडवाडा येथील जरीना अहमद परांडे वय ३९ वर्षे या महिलेने आत्महत्या केल्याचे आज निष्पन्न झाले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे.

जरीना परांडे या दोन दिवसांपासून हरवल्या असल्याची फिर्याद त्यांच्या घरातल्यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात केली होती. आज त्यांचे शव पोलिसांना मिळून आले. जरीना परांडे यांचे पती बाहेरगावी असतात. घरी सासू सासरे व अन्य मंडळी आहेत.

याबाबत अधिक तपास शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.