ग्रामीण अर्थकारणाला गती देण्याची गरज – जि.प. माजी अध्यक्षा शौमिका महाडिक
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : शेतीपूरक व्यवसायांचे कौशल्य महिलांना हाती देवून, ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला गती देण्याची गरज आहे. असे मत प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

घोळसवडे तालुका शाहुवाडी इथं आयोजित केलेल्या महिला सबलीकरण मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमा फाटक उपस्थित होत्या.

उपस्थितांचे स्वागत विठलाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी केले.

यावेळी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्या महिला स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. कर्तुत्ववान पाच महिलांना मानपत्र, शाल, श्रीफळ देवून सौ महाडिक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये अंगणवाडी सेविका कलावती येळवणकर ( आल्तूर ), स्वरदा फडणीस, सेंद्रिय शेती पिकवणारी रश्मी चाळके ( ठाणेवाडी ), वायरवूमन नीलिमा गडपाइले, कुस्तीपटू अनुष्का भोसले या मान्यवर महिलांना गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख वक्ते चंद्रशेखर फडणीस यांनी महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी अमृत भोसले, सुविधा लेले, पांडुरंग धोंडपुडे, केंद्रसमन्वयक राजेंद्र लाड तुकाराम मोरे यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी अॅड. इंद्रजीत कांबळे, विलास शेळके, सुदीप वडींगे, अॅड. राजीव शिंगे, मंदार जोशी, बाळासाहेब जिरगे, लक्ष्मण पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रमेश कांबळे यांनी मानले.