जोतिबाच्या नावानं चांग भलं, : आज दख्खन चा राजा जोतीबा ची चैत्र पौर्णिमा यात्रा
बांबवडे : दख्खन चा राजा ” जोतीबा ” ची चैत्र पौर्णिमा ची यात्रा आज दि.५ एप्रील २०२३ पासून सुरु झाली आहे. या यात्रेस केवळ महाराष्ट्र च नव्हे तर कर्नाटक आंध्र प्रदेश अशा इतर राज्यातून सुद्धा भाविक यात्रेसाठी येतात. “जोतिबाच्या नावानं चांग भलं, केदारलिंगाच्या नावानं चांग भलं ” असा जयघोष करीत भाविक इथं येवून मंत्रमुग्ध होतात.

दरम्यान अनेक राज्यातून तसेच भागातून मानाची ” सासन काठी ” जोतीबा डोंगरावर पोहोचल्या आहेत. आणि अनेक सासन काठ्या येण्याच्या मार्गावर आहेत.

दख्खनचा राजा जोतीबा हे अनेकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे इथं चैत्र पौर्णिमेला जोतीबा डोंगरावर या यात्रेनिमित्त अनेकांचे दोन दिवस वास्तव्य असते. देवाची पालखी, सासन काठ्या आणि गुलालाची उधळण हे प्रमुख आकर्षण या यात्रेत असते.

यात्रेनिमित्त पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त इथं ठेवला जातो.