बांबवडे कुस्ती मैदानाची एक नंबर ची कुस्ती कौतुक डफळे यांनी मारली
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील श्री महादेवाच्या यात्रेनिमित सुमारे ७० ते ८० कुस्त्यांचा थरार कुस्ती शौकिनांना पहायला मिळाला. यामध्ये एक नंबर ची कुस्ती समीर देसाई विरुद्ध कौतुक डफळे यांच्यात झाली. या कुस्ती ने कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या रोमहर्षक कुस्ती मध्ये कौतुक डफळे यांनी कुस्ती मारली.

श्री महादेव यात्रेनिमित्त बांबवडे इथं गेले तीन दिवस यात्रेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम संपन्न झाले. देवाची कावड, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि शेवटी कुस्त्यांचा आखाडा संपन्न झाला. या कुस्त्यांच्या मैदानाला विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी कुस्ती शौकिनांचे स्वागत उद्योगपती श्री तानाजीराव चौगुले यांनी केले, तर कुस्ती मैदानाचे निवेदन श्री ईश्वरा पाटील यांनी केले.

कुस्ती हा खेळाचा प्रकार फार पूर्वीपासून सुरु आहे. या कुस्तीला राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय दिला. परंतु सध्याच्या स्थितीत पैलवानांचा खुराक आणि त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असते. त्यामुळे कुस्ती हा प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परंतु आपल्या कोल्हापूर भागात आजही कुस्तीला प्राधान्य आहे. म्हणूनच हि कुस्तीची परंपरा जपण्यासाठी हे मैदानाचे आयोजन आम्ही ग्रामपंचायत बांबवडे व येथील यात्रा समिती ने केले होते. असे मत लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले व यात्रा समिती चे अध्यक्ष दिलीप बंडगर व उपाध्यक्ष अरुण सर्जेराव निकम यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

या मैदानाला ऑलिम्पिक वीर बंडा पाटील रेठरेकर, चंद्रप्रकाश पाटील, माजी उपसभापती एन.डी. पाटील सावेकर, उद्योजक प्रकाश पाटील, यशराज ऑप्टीकल्स चे ओंकार कदमबांडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच यात्रा समिती सदस्य यांच्या हस्ते सुद्धा अनेक कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी पंच म्हणून प्रकाश काळे, रामचंद्र पाटील, विजय पाटील सावेकर, तानाजी पाटील शित्तुरकर आदींनी पंच म्हणून काम पहिले.

यावेळी ग्रामपंचायत चे उपसरपंच स्वप्नील घोडे – पाटील, सुरेश नारकर, दिपक निकम, व सर्व सदस्य उपस्थित होते. यात्रा समिती चे खजिनदार आनंदा प्रभावळे, सदस्य गजानन निकम, संजय शंकर पाटील, अमर संभाजी निकम, रमेश शामराव पाटील, संतोष शामराव पाटील, उमेश बाबुराव चव्हाण, संदीप रंगराव बंडगर, शरद भिकाजी निकम, शरद शंकर चौगुले, दत्तात्रय परसू कांबळे, विजय जयवंत कांबळे, संजय सुंदर माने, राजेश अनंत कांबळे, महादेव विलास निकम, शामराव बाबुराव कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.