सहकार शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने सहकाराचा मानबिंदू – भेडसगाव नागरी पतसंस्था

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणजे भेडसगाव नागरी सह. पतसंस्था सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. या संस्थेने नेहमीच सर्व सामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. त्याच्याच द्वारे संस्थेला सन२०२२-२३ या आर्थिक वर्षात संस्थेस १ कोटी ६५ लाख रुपयांचा नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे सर्वेसर्वा व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती श्री हंबीरराव पाटील बापू यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.


यावेळी श्री हंबीरराव पाटील पुढे म्हणाले कि, संस्था ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरल्याने, आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये १९.०६ % नि वाढ होवून, एकूण ठेवी १४० कोटी ६२ लाख इतक्या झाल्या आहेत. कर्ज वाटपामध्ये ११.७७ % वाढ होवून, ८८ कोटी ५० लाख इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेने ९६.०२ % कर्ज वसुली केली असून, संस्थेचा नेट एन.पी.ए. ३ % आहे. संस्थेच्या एकूण व्यवसायामध्ये १६.१३ % नि वाढ होवून, एकूण ठेवी १४०.६२ व कर्जे ८८.५० कोटी कर्ज वाटप केले आहे. संस्थेने या वर्षी २२९.१२ कोटींचा व्यवसाय केला आहे. संस्थेने सध्या एकूण ठेवीच्या ४५.२६ % म्हणजेच ६८.६३ कोटी इतकी गुंतवणूक इतर बँकेत केले आहे. पुढील वर्षात संस्था १६५ कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचा मानस आहे. संस्थेचे भाग भांडवल व निधी १५ कोटी ७८ लाख असून, सभासदांना प्रती वर्षी १० % लाभांश दिला जातो. मयत सभासदांच्या वारसांना विशेष सवलत , आजारी सभासदांना मदत निधी, संस्था कर्मचारी व सभासद यांना ३ लाखांचा मेडिक्लेम व संस्था कर्मचाऱ्यांचा १० लाखांचा विमा संस्थेने उतरवला आहे.


सहकार शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने सहकाराचा मानबिंदू म्हणून गौरविलेली पतसंस्था, संस्थेला आदर्श पतसंस्था पुरस्कार, संस्थेस बँको पतसंस्था पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेमध्ये सध्या RTGS / NEFT सुविधा, डिमांड ड्राफ्ट , वीज बिल भरणा सुविधा, विश्वास साखर, उदय साखर कारखाना ऊस बिल वितरण आदी योजना, व सुविधा उपलब्ध आहेत.


संस्थेस संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र वाढ मिळाली असून, भविष्यात संस्थेचा शाखा विस्तार, ठेवीमध्ये व कर्ज वाटप वाढ व्यवसायवृद्धी यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे देखील संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील बापू यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!