रेठरे तालुका शाहुवाडी येथील एक इसम वीज पडल्याने ठार
बांबवडे : रेठरे तालुका शाहुवाडी येथील एका इसमावर वीज पडून, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना आज. ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे समजते.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बाबुराव बापू जाधव ( वय ६२ वर्षे ) हे घराशेजारी असलेल्या जनावरांच्या वैरणीची होळी झाकून ठेवत असताना, अचानक आलेल्या वळवाच्या पावसामुळे बाबुराव जाधव यांच्यावर अचानक वीज पडली. या घटनेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना दुपारी तीन नंतर आलेल्या वळवाच्या पावसामुळे वीज पडल्याने घडली आहे.

बाबुराव जाधव हे गरीब कुटुंबातील असून, त्यांच्या पश्चात घरात पत्नी व ५ वर्षांची लहान मुलगी आहे. हे छोटे कुटुंब होते. घरातील उदरनिर्वाह दुधावर आणि तुटपुंजा शेतीवर सुरु होता. त्यांच्या निधनानंतर जाधव यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.