भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
बांबवडे : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने विनम्र आदरांजली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला. पिचलेल्या समाजाला जगण्याची नवी दृष्टी दिली. ” उठा, शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा,” हा महामंत्र पिचलेल्या समाजाला देवून स्वाभिमानाने कसे जगावे, याचे शिक्षण दिले.

अपमानाचे घोट पिणाऱ्या समाजाला लढण्याची जिद्द या महामानवाने दिली. म्हणून आज आपण स्वाभिमानाने जगत आहोत. आज मिळालेली लोकशाही ची देणगी सुद्धा याच व्यक्तिमत्वाने अखंड भारतवर्षाला संविधानाच्या माध्यमातून दिली. त्यामुळेच संपूर्ण देश मुठभर लोकांच्या हातातून प्रत्येकाच्या सोबत उभा राहिला. हे व्यक्तिमत्व संपूर्ण भारत देश कधीच विसरू शकणार नाही.

अशा या महामानवाला पुनश्च विनम्र अभिवादन.