लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले
शिराळा प्रतिनिधी : चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या पाच विद्यार्थ्यांनी केंद्रात गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.

शिराळा तालुक्यातून देखील या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चे विद्यार्थी सन २०२३ च्या वर्षी समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत एकूण पाच विद्यार्थी केंद्रात गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

इयत्ता पहिली मधील ज्ञानदा भानुदास तळेकर केंद्रात तृतीय, इयत्ता दुसरी मधील शुभम किरण पाटील, योगीराज दिगंबर भाकरे केंद्रात तृतीय, इयत्ता तिसरी शिवतेज मोहन यादव, इयत्ता चौथी अथर्व प्रमोद कांबळे केंद्रात तृतीय असे एकूण पाच विद्यार्थी केद्रात तृतीय आले आहेत.

या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी. पी. गवळी सर, तसेच शिक्षक वृंद संग्राम पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.