साळशी इथं सुमारे ५८ कोंबड्यांच्या माना मुरगळल्या – विकृत मनोवृत्तीनं तालुक्याला डाग ?
बांबवडे : माणूस किती निर्घृण असू शकतो. याचं जिवंत उदाहरण आपल्याला साळशी तालुका शाहुवाडी इथं पहायला मिळालं. एका तरुणाने परिस्थितीशी झगडण्याची केलेली मेहनत कोणाच्यातरी डोळ्यात खुपली, आणि एक तरुण उद्योगाला मुकला. याचं जिवंत उदाहरण या घटनेनं समोर आलं. याबाबत शाहुवाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परंतु त्याचा किती फायदा होईल ? हे ईश्वरालाच माहित. असो.
साळशी तालुका शाहुवाडी येथील लक्ष्मण ज्ञानदेव पाटील यांचा जनावरांचा गोठा गावापासून काही अंतरावर खड्ड्यांचा माळ या नावाने प्रसिद्ध असलेल्या शेतात आहे. यामध्ये त्यांचा मुलगा वडिलांच्या दुग्ध व्यवसायासोबत अक्षय हा कुक्कुटपालन व्यवसाय करीत होता. आपल्या वडिलांसोबत त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी तो कुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून. त्याने घरातील दुधाच्या जनावरांसोबत सुमारे ७० गावठी कोंबड्या पाळल्या होत्या. परंतु शनिवार दि.१५ एप्रिल च्या रात्री च्या दरम्यान त्या कोंबड्यांच्या माना मुरगळून कोंबड्यांची निर्घृण हत्या अज्ञातांकडून करण्यात आली. कोंबड्यांसह त्यांची काही पिल्लं देखील होती. परंतु त्यांच्या सुद्धा माना मुरगळल्या. हि घटना अक्षय ला रविवारी सकाळी शेड कडे गेल्यानंतर समजली . आणि त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या स्वप्नांच्या देखील माना अशाच अज्ञातांनी मुरगळल्या. याला जबाबदार कोण ? विकृत मनोवृत्ती कि, हातपाय गाळणारे रक्षक ? असा प्रश्न देखील सर्व सामान्य जनतेला पडला आहे.
अक्षय हा सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे. आपल्या वडिलांसोबत शेती आणि म्हैशी पळून दुग्ध व्यवसाय करीत होते. चार महिन्यांपूर्वी दुग्धव्यवसाया सोबत कुक्कुटपालन त्याने सुरु केले. चार महिन्यांपूर्वी फक्त २५ गावठी कोंबड्या त्याने घेतल्या. त्या २५ कोंबड्यांच्या सुमारे ७० ते ८० कोंबड्या झाल्या होत्या. पण चोरट्यांनी शेड चे कुलूप तोडून, सुमारे ५८ कोंबड्यांच्या माना मुरगळल्या आणि, अक्षय च्या आत्मविश्वासाच्या लढ्यावर पाणी ओतले.
सदर घटनेची शाहुवाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांचा पंचनामा देखील पशुवैद्यकीय अधिकारी व पोलिसांसमोर करण्यात आला आहे. सदर च्या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
अधिक तपास शाहुवाडी पोलीस ठाणे करीत आहे. परंतु या तपासामुळे किती फरक पडणार ? हा प्रश्नच बांबवडे पंचक्रोशीला पडला आहे.