सुपात्रे येथील तरुणीची राहत्या घरात आत्महत्त्या
बांबवडे : सुपात्रे तालुका शाहुवाडी इथं एका तरुणीने घरातील बडोद्याला गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार सुपात्रे तालुका शाहुवाडी इथं आज दि.१६ एप्रील२०२३ रोजी दुपार नंतर एका
तरुणीने आपल्या राहत्या घरातील बडोद्याला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

सदर घटनेची नोंद बांबवडे चौकीत करण्यात आली आहे. अधिक तपास शाहुवाडी पोलीस ठाणे करीत आहे.