कडवे तालुका शाहूवाडी येथे 26 एप्रिल रोजी तुफानी कुस्ती मैदानाचे आयोजन – माजी सभापती विजय खोत
शाहूवाडी प्रतिनिधी (संतोष कुंभार )
कडवे तालुका शाहूवाडी येथील श्री विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त ग्रामस्थ ‘ मुंबईकर मंडळी व ग्रामपंचायत कडवे यांच्या वतीने महाराष्ट्रातील तुफानी मल्लांचें कुस्ती मैदान बुधवार 26 एप्रिल २०२३ रोजी आयोजित केले आहे. या मैदानाचा पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनानी लाभ घ्यावा, असे आवाहन शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती विजय खोत यांनी केले आहे .

प्रति वर्षाप्रमाणे विठलाई देवीच्या यात्रेनिमित्त यावर्षी प्रथम क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरूध्द पंजाब केसरी सत्येंद्र कुमार ‘तर द्वितीय क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यात होणार आहे .तर तिसऱ्या क्रमांकासाठी निर्को महाराष्ट्र केसरी समीर देसाई विरुद्ध कर्नाटक केसरी कार्तिक काटे यासह अनेक चटकदार कुस्त्या होणार आहेत .

लहान मल्ल निखिल माने विरुद्ध सोहम पाटील ही एक नेत्र दीपक कुस्ती होणार आहे .या कुस्ती मैदानासाठी गावातील अनेक दानशूर देणगीदारां कडून हे मैदान संपन्न होत आहे .या मैदानाचा पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनानी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी सभापती विजय खोत यांनी केले आहे .