राजकीयसामाजिक

शाहुवाडी तालुक्यात एमआयडीसी च्या माध्यमातून बेरोजगारीला पूर्ण विराम मिळेल -खासदार धैर्यशील माने

मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ):
    गेले बरेच दिवस प्रलंबित असलेल्या शाहूवाडी तालुक्यात एमआयडीसी साठी तत्वत: मान्यता मंत्रिमंडळात मिळाल्या नंतर एमआयडीसी साठी खासदार धैर्यशील माने यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व तहसीलदार यांच्या समवेत   शाहुवाडी तालुक्यात ३ ठिकाणी जागेची पाहणी केली. आवश्यक ती माहिती संबंधित विभागाकडून घेतली असून लवकरच एमआयडीसी च्या माध्यमातून तालुक्यातील बेरोजगारीला पूर्ण विराम मिळेल, अशा आशयाचा आशावाद खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी व्यक्त केला.


     तालुक्यात औद्योगिक दृष्ट्या कोणतीच प्रगती झालेली नाही. तालुक्यातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी या माध्यमातून शाहूवाडी तालुक्यात एमआयडीसी उभा रहावी. यासाठी खा. धैर्यशील माने यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. ४ दिवसापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ जागा पाहणी करण्याचे आदेश देऊन एम आय डी सी साठी तत्त्वतः मान्यता दिली.


    या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यंशील माने यांनी एमआयडीसी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील एमआयडीसीचे आरओ राहुल भिंगारे, अधीक्षक अभियंता श्री गावडे, शाहूवाडी तालुका तहसीलदार रामलिंग चव्हाण   यांच्या समवेत अमेणी, वारूळ, डोणोली  या ठिकाणच्या जमिनीची पाहणी करून एमआयडीसी बाबत आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा याबाबत अधिक माहिती घेतली.


     दरम्यान खासदार धैर्यशील माने व उद्योग विभागाचे अधिकारी यांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना जागे बाबतची अधिक माहिती घेऊन अहवाल सादर करावा अशी सूचना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देसाई, तलाठी श्री जाधव, श्री कडू, सुभाष जामदार शासकीय अधिकारी, कर्मचारी, पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!