शाहूवाडी तालुक्यात महाराजस्व शिबिराचे २१ ते २८ एप्रिल रोजी आयोजन- लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन
शाहुवाडी प्रतिनिधी ( संतोष कुंभार ):
शाहुवाडी तहसील कार्यालयाच्या वतीने महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . 21 एप्रिल पासून 28 एप्रिल पर्यंत तालुक्याच्या चार विभागात या शिबिराचे आयोजन केलं आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी केले आहे.

21 एप्रिल रोजी सरूड ‘ येथून अभियानाला सुरुवात होत असून, 26 एप्रिल तुरूकवाडी ‘, 27 एप्रिल साळशी ‘, 28 एप्रिल करंजफेण, या ठिकाणी या महाराजस्व अभियान आयोजन केलं आहे .

या ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती ‘दाखले वितरित केले जाणार आहेत .नागरिकांचा वेळ वाचावा व त्वरित त्यांना दाखले उपलब्ध व्हावेत या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येत आहे . याचा अधिकाधिक नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी केले आहे .