पै.पृथ्वीराज मगदूम यांनी राष्ट्रीय स्तरावर ब्रांझ पदक पटकावले : शाहुवाडी चा झेंडा उत्तर प्रदेश मध्ये फडकला…
बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी चे पैलवान पृथ्वीराज राजाराम मगदूम या पैलवानाने उत्तर प्रदेश मधील गोंडा इथं झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शाहुवाडी चा झेंडा फडकवला आहे.


त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन. तसेच त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उत्तर प्रदेश येथील गोंडा इथं राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये साळशी तालुका शाहुवाडी येथील नामांकित पैलवान राजाराम मगदूम यांचे ते चिरंजीव आहेत. पैलवान पृथ्वीराज मगदूम यांनी ११० किलो वजनी गटात कुस्ती मारून ब्रांझ पदक पटकवले आहे.

आजही कुस्ती देशाच्या नकाशावर आपले नाव टिकवून आहे. म्हणूनच उत्तर प्रदेश मधील नॅशनल कुस्ती कॅडेट स्पर्धा संपन्न झाल्या. अनेक पैलवानांनी आपला जोर या स्पर्धेत आजमावला. यामध्ये आपल्या साळशी च्या पृथ्वीराज मगदूम पैलवानाने शाहुवाडी चा झेंडा अटकेपार फडकवला, याचा आपण शाहुवाडी वासियांना निश्चितच अभिमान आहे.