मलकापूर – मुंबई एसटी बस सेवा सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळा सुरु झालीय : एसटी चे आभार
बांबवडे : मलकापूर एसटी आगार व कोल्हापूर एसटी आगार यांच्या सौजन्याने मलकापूर ते परळ सकाळी आणि रात्री अशा दोन्ही वेळेत एसटी बस सुरु झाल्याने, प्रवाशी वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोल्हापूर व मलकापूर या दोन्ही आगार प्रमुखांचे प्रवाशांकडून आभार मानण्यात येत आहे.

मलकापूर पिशवी कोकरूड, शेडगेवाडी, सातारा मेगा हायवे मार्गे परळ असा एसटी बस चा मार्ग राहणार आहे. हि बस मलकापूर मधून सकाळी ८.०० वाजता सुटते.

तसेच पिशवी मधून बस सुटण्याची वेळ सकाळी ९.०० वाजता आहे. हि बस परळ मुंबई येथून सकाळी ७.३० वाजता सुटते.
तसेच मलकापूर- परळ हि बस सायंकाळी ५.३० वाजता मलकापूर येथून सुटते. तसेच परळ – भेडसगाव सुटनेची वेळ सायंकाळी ८.०० वाजता आहे.

दरम्यान महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना प्रवासामध्ये ५० % सवलत मिळत आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ योजने अंतर्गत प्रवाशांना १०० % (मोफत ) सवलत देण्यात येत आहे. अधिक माहिती साठी मलकापूर बस स्थानक ०२३२९ २२४१३१ बांबवडे बस स्थानक ०२३२९ २३४४३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन एसटी विभागाकडून करण्यात येत आहे.