दि. 26 एप्रिल ला  मोळवडे तालुका शाहुवाडी येथे विठ्ठल रखुमाई मंदिराची प्राण प्रतिष्ठापना

शाहुवाडी प्रतिनिधी ( संतोष कुंभार )
    मोळवडे तालुका शाहुवाडी येथे खोपडे मळा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्राण प्रतिष्ठापना ‘, कलश रोहन ‘ व वास्तुशांती सोहळा ‘ बुधवार 26 एप्रिल रोजी संपन्न होणार असल्याची माहिती प .पू . बालदास महाराज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष रंगराव खोपडे यांनी दिली .


     बुधवार दि. 26 एप्रिल रोजी सकाळी साडे सात ते साडेदहा या कालावधीत होम हवन व सत्यनारायण महापूजा रंगराव खोपडे व अलका खोपडे यांच्या हस्ते होणार आहे .कलशरोहन सोहळा सिद्धगिरी मठ कणेरीचे श्री चिदानंदस्वामी ‘ बालयोगी रामदास महाराज मठाधिपती सवते यांच्या हस्ते होणार आहे .


या सर्व कार्यक्रमासाठी पारसनाथ महाराज 32 शिराळा येथील ‘ वेदांतचार्य स्वामी निर्मलानंद गिरीजी ‘ श्रीमान सचिन नंदन कुमार दास ब्रह्मचारी पुणे, ‘श्री बालस्वामी समर्थ महाराज कसबा बावडा ‘यांच्यासह आमदार विनय कोरे, माजी आमदार अमल महाडिक यांची उपस्थिती लाभणार आहे .


    रात्री नऊ ते अकरा या वेळेत ह भ प पप्पू महाराज पाटण यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे . दुपारी बारानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!