सामाजिक

संयुक्त  उचतकर युवकांच्या वतीने मलकापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

शाहुवाडी प्रतिनिधी ( संतोष कुंभार ) : तळपती ज्योत ‘भगवा झेंडा ‘आणि ” छत्रपती शिवाजी महाराज की जय ” असा घोष करत,  छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आलेली शिवजयंती शाहूवाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .


पन्हाळगड, ‘ विशाळगड या ठिकाणाहून ज्योत घेऊन अनेक शिवप्रेमी येत होते . शाहुवाडी तालुक्यातील उचत  येतील संयुक्त उचतकर येथील युवकांनी पन्हाळगडावरून ज्योत घेऊन येत, मलकापूर येथील सुभाष चौकातील शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले .


     शाहुवाडी तालुक्यात सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात शिव जयंतीनिमित्त शिवमय वातावरण झाले होते . उचत येथील युवकांनी  पन्हाळगडावरून ज्योत आणली होती . याबरोबरच तालुक्याच्या विविध भागात शिवजयंती निमित्त विशाळगड ‘ पन्हाळगड या ठिकाणावरून ज्योत घेऊन जाण्यासाठी अनेक ठिकाणाहून शिवप्रेमी आले होते .सर्वत्र भगवे झेंडे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवजयंती साजरी केली जात होती . चिमुकल्यां सह सर्वांनीच शिवजयंती साजरी केली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!