सवते च्या ” प्रज्ञा देवार्डे ” चे नेत्रदीपक यश
सरूड प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या सवते या गावातील प्रज्ञा मारुती देवार्डे या युवतीने आपल्या मेहनतीने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वर्ग एक अधिकाऱ्यांच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.

याचबरोबर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सवते येथील प्रज्ञाचे प्राथमिक शिक्षण ठमकेवाडी इथं आजोबांच्या घरी झाले. वडील नोकरीनिमित्त नाशिक इथं असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नाशिक इथं झाले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. या माध्यमातून तिने स्टेट बँक ऑफ इंडिया वर्ग एक अधिकारी पदाची परीक्षा दिली. स्वकष्टाने तिने या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे.

या यशासाठी तिला शिक्षक, आई – वडील यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या नेत्रदीपक यशामुळे तिच्यासह तालुक्याचे नाव देखील उज्वल झाले आहे. भविष्यात तिच्या वाटचालीस एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.