कोडोली मध्ये स्वामी कलेक्शन चे भव्य वस्त्र दालन चा उद्घाटन सोहळा संपन्न
बांबवडे : स्वामी कलेक्शन चे बांबवडे तालुका शाहुवाडी येथील यशस्वी व्यवस्थापने नंतर कोडोली तालुका पन्हाळा येथील सर्वोदय सोसायटी मध्ये भव्य वस्त्र दालनाचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, तसेच अमरसिंह पाटील भाऊ यांच्या हस्ते संपन्न झाले.

स्वामी कलेक्शन चे वस्त्र दालन भव्य अशा २०००० च्या जागेत उभे राहिले आहे. या वस्त्र दालनाचा उद्घाटन सोहळा दि.२२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.
या कार्यक्रमास आमदार डॉ. विनय कोरे साहेब, गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड, डॉ. जयंत प्र. पाटील साहेब,यांनी उपस्थिती दर्शविली होती.

याचबरोबर सर्वश्री सर्वोदय सोसायटी चे चेअरमन लक्ष्मणराव कुलकर्णी काका, वारणा बँकेचे संचालक प्रमोद कोरे काका, वारणा साखर चे संचालक सुभाष पाटील आण्णा, कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील, सर्वोदय सोसायटी चे व्हा. चेअरमन शिवाजी पाटील काका, वारणा साखर चे संचालक सुरेश पाटील बापू, वारणा दुध संघाचे संचालक शिवाजी कापरे बापू, दत्त पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन वसंत केकरे, कोडोली पोलीस ठाणे च्या पोलीस निरीक्षक शीतल डोईजड, कोडोली हौसिंग सोसायटी चे चेअरमन मानसिंग पाटील, कोडोली ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. भारती पाटील, कोडोली विभाग शिक्षण मंडळ चे अध्यक्ष अजिंक्य पाटील भैय्या, कोडोली ग्रामपंचायत चे उपसरपंच माणिक मोरे, आनंद पाणी पुरवठा चेअरमन प्रशांत पाटील, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर चे सभापती विशांत महापुरे, वारणा बँकेचे संचालक डॉ. प्रशांत जमणे, कोडोली नागरी पतसंस्थेचे चेअरमन संजय मेनकर, उद्योजक सुरेश कापरे, ग्रामपंचायत राज्य संघटिका सौ. प्रमोदिनी माने, बजरंग दल चे सुरेश रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी स्व. दीपक नारायण जाधव दाजी यांच्या प्रतिमेचे स्मृतीपूजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत श्री बाळासो आण्णासो चौगुले हे होते. यावेळी स्वागतोत्सुक सर्वश्री विनायक सटाले, पांडुरंग कुऱ्हाडे, अमर बाळासो चौगुले, अमित बाळासो चौगुले, ओमप्रकाश वसंत गंगणे आदी मान्यवर होते.
स्वामी कलेक्शन च्या शाखा बांबवडे, मलकापूर, इचलकरंजी इथं कार्यान्वित आहेत.