दिवंगत गौतम कांबळे सर यांना जीवन गौरव पुरस्कार : दिवंगत आनंदा दौलू कांबळे सोशल फौंडेशन- सरदार कांबळे
बांबवडे : भारतीय दलित महासंघाचे संस्थापक दिवंगत गौतम कांबळे सर यांना जावून एक वर्ष पूर्ण झाले. नुकतेच त्यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन कार्यकर्त्यांनी विवध उपक्रमांनी संपन्न केला.

दरम्यान दिवंगत आनंदा दौलू कांबळे सोशल फौंडेशन च्या वतीने दिवंगत गौतम कांबळे सरांना त्यांच्या मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सरदार कांबळे यांनी यावेळी जाहीर केले. हा पुरस्कार सोहळा वितरण समारंभ पुढील महिन्यात होणार असल्याचेही सरदार कांबळे यांनी यावेळी सांगितले.