पाटणे येथे गव्यांचे दर्शन
सरूड प्रतिनिधी : पाटणे (ता.शाहूवाडी) येथे गव्याचे दर्शन झाल्याने परिसरात शेतकरी बांधवाच्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषीपंपांना वीजपुरवठा रात्रपाळीत असल्याने शेतकरी पहाटे पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता, त्यांना आपल्या समोरच दोन गव्यांचे दर्शन झाले. भितीने त्यांनी तेथून पळून जाऊन आसपासच्या लोकांना याची माहिती दिली.

यावेळी पाटणे येथील शेतकरी आनंदा पाटील,अजित पाटील, अमोल पाटील,अरविंद पाटील, रमेश पाटील, राहुल पाटील, बाबासो नांगरे, सिद्धेश नांगरे, अविनाश वाळके या शेतकऱ्यांनी प्रसगांवधान दाखवून आपल्या पिकातून हुसकावून लावले. त्यातील एक गवा नदीत उडी घेऊन शिंपे गावच्या हद्दीत गेला. तर दुसऱ्या गव्याने सावे येथे पळ काढला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.