भाडळे येथील शाहू कालीन ” एक गाव एक पाणवठा विहिरी ” चा लोकार्पण सोहळा आज संपन्न होतोय
बांबवडे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दूरदृष्टी ठेवून समाजात ” एक गाव एक पाणवठा ” निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. या माध्यमातून समाजातील स्पृश्य-अस्पृश्य भावनांना त्यांना तिलांजली द्यायची होती. असाच ” एक गाव एक पाणवठा ” महाराजांनी भाडळे तालुका शाहुवाडी इथं रमाई नगर मध्ये त्याकाळी एका विहिरीच्या माध्यमातून निर्माण केला होता.

आज त्या पाणवठ्याचे विहीर दुरुस्ती, मजबुतीकरण, व सुशोभीकरण असे विकास काम पूर्ण झाले असून, त्याचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते आज दि.२६ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता भाडळे येथील रमाईनगर मध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत भाडळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाण्याचे स्त्रोत जतन करण्याचे आदेश आपल्या अष्ट प्रधान मंडळाला दिले होते. ज्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होईल.

आज त्याच अनुषंगाने शाहू कालीन विहिरीचे पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे.