शिंपे च्या ज्योतिर्लिंग सेवा संस्थेच्या चेअरमन पदी उत्तम पाटील तर व्हा. चेअरमन पदी गणपती पाटील यांची वर्णी
बांबवडे : ज्योतिर्लिंग वि.का.स. सेवा संस्था शिंपे तालुका शाहुवाडी च्या चेअरमन पदी उत्तम आनंदराव पाटील तर व्हा. चेअरमन पदी गणपती मारुती पाटील यांची वर्णी लागली आहे.

काही दिवसांपूर्वी ज्योतिर्लिंग वि.का.स. सह. सेवा संस्थेची निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत ज्योतिर्लिंग विकास पॅनेल चे नेतृत्व अजित गुंगा पाटील यांनी केले होते. यावेळी ग्रामस्थ व शेतकरी मंडळींनी ज्योतिर्लिंग पॅनेल वर विश्वास ठेवला.

या निवडणुकीत एकूण १३ जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी तानाजी गुंगा जाधव अपक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यापैकी १२ जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली. यापैकी कर्जदार गटामधून सदाशिव तुकाराम पाटील, बाबासो बळवंत पाटील, शिवाजी बाळू पाटील, दादासो महिपती पाटील, नानासो नामदेव पाटील, सदाशिव धोंडीराम पाटील, उत्तम आनंदराव पाटील, गणपती मारुती पाटील, महिला राखीव प्रतिनिधी गटातून आशा अजित पाटील, वत्सला सर्जेराव पाटील, इतर मागास प्रवर्ग गटातून उदय बाबुराव पाटील, अनुसूचित जाती गटातून भारत शामराव काळे हे निवडून आले आहेत.

सर्व विजयी उमेदवारांचे तसेच चेअरमन उत्तम आनंदराव पाटील व व्हा. चेअरमन गणपती मारुती पाटील यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन.