रविवार च्या अपघातातील ट्रक चालकाचा उपचारा दरम्यान आज दि.२८ एप्रिल रोजी मृत्यू
सरूड प्रतिनिधी : रविवार दि.२३ एप्रिल रोजी रात्री दोन वाजण्याचा सुमारास झालेल्या ट्रक आणि बस च्या अपघातातील ट्रक चालक गंभीर जखमी झाला होता.
त्या ट्रक चालकाचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्याचे नाव सनी शिवाजी नाईक वय ३२ वर्षे राहणार सरूड, तालुका शाहुवाडी असे आहे. त्याला अपघात दरम्यान डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्याला पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. या घटने मुळे सरूड गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.