बांबवडे प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत बांबवडे च्या वतीने सत्कार सोहळा संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळा बांबवडे मधील विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. हा सत्कार ग्रामपंचायत बांबवडे च्या वतीने करण्यात आला.

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


केंद्रीय प्राथमिक विद्यामंदिर बांबवडे च्या वतीने घेण्यात आलेल्या समृद्धी परीक्षा, टॅलेंट प्लस, ऋणानुबंध, मंथन या खाजगी परीक्षेसोबत इयत्ता ४ थी प्रज्ञा शोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

हा सत्कार सोहळा लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले, उपसरपंच श्री स्वप्नील घोडे-पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, तलाठी श्री मुलाणी, ग्रामसेवक श्री कुरणे, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

गुणवंत विद्यार्थी पहिली साठी श्री जयसिंग पाटील व स्वामी सर यांचे मार्गदर्शन लाभले. दुसरी साठी श्री सुभाष सुतार व राजश्री पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तिसरी साठी सौ. चेतना नीलकंठ मॅडम, व जोशी सर यांचे मार्गदर्शन लाभले. ४ थी साठी श्री किरण सुतार, व मुख्याध्यापक गुरव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धा परीक्षेत प्राथमिक शाळेतील ४० विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर ६ विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेत कौशल्य दाखवले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत कार्यालय बांबवडे च्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने देखील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन.

यावेळी शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.