श्री जुगाई देवी च्या मंदिराची वास्तुशांती व कलशारोहण सोहळा बुधवार दि.३ मे रोजी संपन्न होणार
येळवण जुगाई प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील येळवण जुगाई येथील पंचक्रोशीची ग्रामदैवत श्री जुगाई देवी च्या मंदिरा च्या जीर्णोधाराचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराची वास्तुशांती व कलशारोहण सोहळा बुधवार दि. ३ मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे. अशी माहिती येथील देवस्थान उपसमिती चे अध्यक्ष शरद कांबळे व जुगाई देवीचे पुजारी बबन गुरव यांनी दिली आहे.



बुधवार दि. ३ मे रोजी पहाटे श्री जुगाई देवीस महा अभिषेक पूजा विधी , नवग्रह पूजन, वास्तू होम, कलश पूजन होणार आहे.

कलशारोहण सोहळा श्री. गुरु प.ब्र. १०८ श्री महादयार. रविशंकर महाराज (रायपाटण ) यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. श्री जुगाई देवीच्या वास्तू शांती, व कलशारोहण सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ह.भ.प. श्री गुरुवर्य प्रसाद महाराज बडवे ( पंढरपूर ) यांचे वारकरी हरी कीर्तन कार्यक्रमासह स्थानिक भजनी मंडळाचा कार्यक्रम देखील होणार आहे.

या सोहळ्यासाठी माजी खासदार युवराज श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्यासह पंचायत समिती, जिल्हापरिषद, ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पंचक्रोशीतील मान-,मानकरी, सासन काठ्यांचे मानकरी, कोल्हापूर, कोकण, मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कर्नाटक, आदी भागातील भाविक उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत राहणार असल्याची माहिती, ग्रामपंचायत चे सरपंच सत्यवान खेतल, उपसरपंच इस्माईल महात यांनी दिली.

श्री जुगाई देवी मंदिर वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यानिमित्त देवस्थान उपसमिती, ग्रुप ग्रामपंचायत, ग्रामस्थ, भजनी मंडळ यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

(आवाहन येळावण जुगाई पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी २८ एप्रिल ते ९ मे पर्यंत मांसाहार, मद्यपानासह मांसाहार जत्रा न करण्याचे आवाहन देवस्थान समिती, ग्रामपंचायत येळवण जुगाई यांच्यावतीने करण्यात आले आहे.