राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मान्यवरांसहित नव्या पिढी ची देखील मानवंदना
सरूड प्रतिनिधी : सरूड तालुका शाहुवाडी इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मान्यवरांसहित नव्या पिढीने देखील विनम्र अभिवादन केले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन, मानाचा मुजरा.

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त सरूड येथील छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तळ्याकाठी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळून लोकराजा ला मानाचा मुजरा केला. सरूड इथं शाहू महाराजांनी त्यांच्या काळात तलावाची बांधणी केली होती. परंतु आजही त्या तलावाचे नामकरण करण्यात आलेले नाही. हे आपले दुर्दैव आहे. असो. राजर्षी शाहू महाराज हे एक दृष्टे व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्या काळात शिक्षणाचे महत्व ओळखून प्राथमिक शिक्षण मोफत केले. स्पृश्य-अस्पृश्यतेच्या बेड्या तोडण्यासाठी एकात्मतेची मशाल पेटवली. विद्यार्थ्यांसाठी मोफत वस्तीगृह निर्माण केलीत. कोल्हापुरात मोठ मोठी धरणे निर्माण केलीत. दुष्काळात शेतकऱ्यांसाठी या लोकराजाने अन्नदानाचे महत्व पटवून दिले.

अशा आमच्या या लोकराजांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम सध्याच्या लोकप्रतिनिधींनी करणे, हि काळाची गरज आहे. महापुरुषांचे नाव फक्त आपल्या राजकारणापुरते न घेता समाजकारणासाठी सुद्धा वापरावे, ज्यामुळे नव्या पिढीला या दृष्ट्या राजाचे महत्व पटेल.

यावेळी प्रास्ताविकपर भाषणात प्रा. प्रकाश नाईक यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वावर चौफेर प्रकाश टाकत उपस्थितांना संबोधित केले.

सरूड इथं भाई भारत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी १०० सेकंद स्तब्धता पाळून, त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महाराजांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी मान्यवरांसहित प्रा. प्रकाश नाईक, पांडुरंग वग्रे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रकाश माने, सुनील जाधव, सुनील नाईक, महेश चव्हाण, संपत जाधव, महादेव वडर, आदर्श नाईक, सुरज घोलप, मानसिंग आडके, दिनेश माने, प्रदीप माने, संतोष गावडे, अॅड. प्रणव थोरात, राजू मगदूम, अशोक परीट, सुरेश म्हाऊटकर, वसंत काणे, चंद्रकांत रेडेकर, जीवन कोकणे, कृष्णात रोडे, अभिजित आपटे सर, करण डाकवे, गौरव कांबळे, अमर रोडे, पवन जाधव, मनोहर भस्मे, सचिन रोडे, सौरभ नाईक, व मान्यवर उपस्थित होते.