अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन च्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी वैद्य दिलखुष तांबोळी, तर सचिव पदी वैद्य विनायक शिंदे
कोल्हापूर प्रतिनिधी : अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन च्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी बांबवडे तालुका शाहुवाडी चे वैद्य दिलखुष तांबोळी यांची, तर सचिव पदी वैद्य विनायक शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने या दोघांचेही हार्दिक अभिनंदन.


याचबरोबर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल वैद्य दिलखुष तांबोळी यांचे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या शिर्डी येथे झालेल्या पदग्रहण समारंभात या निवडी घोषित करण्यात आल्या.

महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन हि संस्था, आयुर्वेदाला वाहिलेली व आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार कार्यासाठी सतत कार्यरत असलेली संस्था आहे. या संस्थेच्या भारत भर शाखा असून ११५ वर्षे जुनी असलेली संस्था आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्ली इथं असून, संस्थेचे आधारस्तंभ राज्य वैद्य व पद्मश्री वैद्य श्री देवेंद्रजी त्रिगुणा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्य राकेश शर्माजी हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. वैद्य एस.एन. पांडेजी उज्जैन हे प्रधानमंत्री आहेत.

दरम्यान माजी अध्यक्ष वैद्य रामदास आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नूतन अध्यक्ष वैद्य सतीश भट्टड यांनी या निवडी घोषित केल्या. कोल्हापूर जिल्ह्याकरिता अध्यक्ष म्हणून वैद्य दिलखुष तांबोळी यांची निवड उल्लेखनीय ठरली.


सध्या आयुर्वेदाला जे यश किंवा सुवर्णदिन दिसत आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. भविष्यातही सगळ्यांच्या सहकार्याने आयुर्वेदाचा प्रचार व प्रसाराचे कार्य अविरत चालविणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष वैद्य दिलखुष तांबोळी सचिव वैद्य विनायक शिंदे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.