शाहुवाडी तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार डॉ. विनय कोरे
बांबवडे प्रतिनिधी : शाहुवाडी तालुका हा भौगोलिक दृष्ट्या डोंगराळ, व वाड्या वस्त्यांवर विखुरलेला आहे. आजही काही वाड्या-वस्त्या विकासापासून कोसो दूर आहेत. अधिकारी वर्गाने व्यवस्थित काम केल्यास आमदार या नात्याने मी कुठेही कमी पडणार नाही. असे मत आमदार डॉ.विनय कोरे यांनी व्यक्त केले.

ते शाहुवाडी पंचायत समितीमधील आढावा बैठकीत बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गटविकास अधिकारी रामदास बघे यांनी व्यक्त केले.


ते पुढे म्हणाले कि, आजही मुलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, दलित वस्तीतील कामे, संजय गांधी निराधार योजनेची कामे, पानंद रस्ते, अशा ग्रामीण स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध कामे सुचवा, जेणेकरून कोणीही सुविधांपासून वंचित राहू नये. कामे सुचवा,आपल्याला सर्वोतोपरी मदत होईल. आपण सर्वांनी समन्वयाने कामे केल्यास, पुढील पाच वर्षांचा शाहुवाडी तालुक्याचा विकास आराखडा तयार करू. मागील चुका न करता, पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला महत्व देवू या. अशा कामांमध्ये राजकारण नको. सत्ताधारी असो,कि विरोधक आमदार म्हणून सर्वच विकास कामांना आम्ही प्रधान्य देणार आहोत, यासाठी गावाच्या विकासाची कामे सुचवा, आमदार म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असे देखील आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले.

आजची बैठक हि प्रामुख्याने शाहुवाडी तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसंदर्भात होती.

यावेळी गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड, सर्जेराव पाटील पेरीडकर, पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत , महादेव पाटील, विष्णू पाटील, रंगराव खोपडे, सरदार कांबळे, कृष्णा पाटील, बाळासाहेब गद्रे, सुभाष इनामदार, शरद चौगुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन क्षमा जाधव यांनी केले.